
दैनिक चालु वार्ता
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
कोरपना तालूका :- नांदा फाटा जवळील रामनगर काॅलनी येथे दोन जानेवारी ला सकाळच्या सुमारास भरधाव ट्रकने सायकलस्वार कंत्राटी कामगारांला धडक दिली, या घटनेत कामगारांच्या उजव्या पायावरून ट्रक गेल्याने त्याचा पाय कायमचा मोडला यानंतर संतप्त नागरिकांनी तब्बल चार तास वाहतूक अडवून ठेवली होती, मागील चार तासांपासून गडचांदूर ते वनोजा मूख्य मार्गावरील वाहतूक बंद ठेवली, मारोती गूलाबजी नवघडे ५५ वय वर्षे राहणार बिबी असे अपघातातील जखमीचे नाव आहे.
ते अल्ट्राटेक सिमेंट कंपनी इथे कंत्राट बेसीकवर काम करत होते आज रविवार सकाळी कामाला गेले पण त्यांची डियू्टी न लागल्याने ते सायकल घेऊन घरी वापीस जात होते, दरम्यान बिबी लगत असलेल्या रामनगर काॅलनी जवळ भरधाव ट्रकने एम एच ३४ एव्ही २७६७ या क्रमांकाचा सीसीआर लाॅजिस्टिक ट्रान्सपोर्टचा ट्रक असून सायकल स्वार कंत्राटी कामगार यांना धडक देत त्यांच्या उजव्या पायावरून गेली या घटनेत मारोती गंभीर रित्या जख्मी झाले
असून त्यांचा उजवा पाय कायमचा गमवावा लागला त्यांच्यावर चंद्रपूर येथे रूग्णालयात उपचार सुरू आहे.
सदर जख्मी व्यक्ती कूंटूबांतील कमविता असल्याने त्यांचा उजवा पाय कायमचा मोडल्याने भविष्यात उदरनिर्वाह चा प्रश्न कूंटूबांवर येण्याची शक्यता आहे, जख्मी मारोती नवघडे ला घटनास्थळी नगद ५०.००० (पन्नास हजार) व आनखी दोन महिन्यांत ५०.००० (पन्नास हजार) आणि बारा महिने प्रतिमहीना ८००० (आठ हजार) असा एकूण १.९६००० रोख उपचारार्थ संपूर्ण खर्च देण्यांत येणार असल्याचे सीसीआर लाॅजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या पत्रावर लिखित स्वरूपात देण्यात आले.