
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पारनेर :- दि.०२जानेवारी२०२२, संध्याकाळी ५वाजून ४५मिनिटांनी अचानक सुरू झालेल्या पावसाने कर्जुले हरेश्र्वर आणि परिसरातील शेतकऱ्यांची धास्ती वाढवली आहे. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने कांदा व वाटाणा पिकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्जुले हरेश्र्वर परिसरातील शेतक-यांचे नियोजन कोलमडले आहे.कांदा रोपे वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे रोगग्रस्त व सडून गेली आहे.लागवड झालेल्या कांद्याला फवारणी करून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जानेवारी महिन्यात वाटाणा पेरण्याचे नियोजन शेतकरी करतात पण अवेळी पाऊस, धुकं यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.