
दैनिक चालु वार्ता
मुक्ताईनगर
सुमित शर्मा
मुक्ताईनगर दि.२(वार्ताहर) :- तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी अपंग मागासवर्गीय निराधार या सर्वांचे शासन दरबारी प्रश्न मांडून न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ विवेक सोनवणे यांची नुकतीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
डॉ विवेक सोनवणे यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी मुक्ताईनगर सह जिल्ह्यात विविध लक्षवेधी आंदोलने, उपोषण, मोर्चे करून शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधून शेतकर्यांना पी.एम किसान योजना,पीकविमा,नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांना न नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी कैफियत मांडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत मा.खासदार राजू शेट्टी यांनी त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे याबद्दल त्यांचे जिल्हाभरातून विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.