
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी :- लोहारा तालुक्यातील माकणी येथिल बी. एस. एस. कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आयोजित मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ रामहरी सुर्यवंशी म्हणाले की, आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी वृत्तपत्र समूहाचे योगदान मोठे आहे.
सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य वृत्तपत्र समूह सातत्याने करीत आहे. ज्ञानी, स्वाभिमानी, स्वावलंबी बनविण्यासाठी तरूणांच्या समोर ज्ञान भांडार खुले केले आहे.बातमी, स्तंभलेखन, अग्रलेख, संपादकीय लेख, मुलाखत, समीक्षात्मक लेखन, संवाद लेखन, निवीदा लेखन बालकांवर सुसंस्कार व्हावेत म्हणून वृत्तपत्रात विशिष्ट प्रकारचे सदर चालविले जाते.त्यामुळे मनोरंजना बरोबरच प्रबोधन करण्याचे कार्य वृत्तपत्रातून घडते आहे.साप्ताहिक, पाक्षिक, मासिक आशा विविध मुद्रित माध्यमांतून लोकशाही जीवनमूल्य समाजात रुजविण्यासाठी मुद्रित माध्यमांचे योगदान मोठे आहे.
रोजगार प्राप्तीचे एक महत्वाचे साधन म्हणून तरुणांनी या क्षेत्राकडे वळले पाहिजे असे मत व्यक्त केले. मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे हे होते. अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आत्मनिर्भर बनण्याचे आव्हान केले.पाहुण्याचा परिचय व सुत्रसंचलन डॉ. काकासाहेब सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एस. इ.मुंडे यांनी मानले.कार्यक्रामाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.