
दैनिक चालु वार्ता
ता.लोहा प्रतिनिधी
मारोती कदम
लोहा :-आज दिनांक 3:01:2022 रोजी जि. प. प्रा. शा. शेलगाव (धा.) येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात. या प्रसंगी शाळेतील बहुतांश मुली सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा मध्ये उपस्थित होत्या व या प्रसंगी सुत्रसंचालन श्री ढवळे सरांनी तर अध्यक्षीय समारोप सौ. पालमकर पी.पी.यांनी केला. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शेलगाव नगरीच्या महिला सरपंच सौ. लक्ष्मीबाई मारोतराव पा कदम, से.स.संस्थेचे चेअरमन श्री मारोतराव पा कदम, प्रमेश्वर पा. भुजबळ, ग्रामसेवक डहाळे साहेब,हरी पाटील कानोडे, योगेश पाटील कदम, अनिल पाटील मुळे, अंगणवाडी ताई धम्म वंदना लोहकरे, रतनबाई गोरकट्टे, मेहताब शेख, निवृत्ती आप्पा गोरकटे, फतरू शेख. आनंदराव भुजबळ, सखाराम मुळे व शालेय विद्यार्थी होते व उपस्थितांचे आभार जाधव सर यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मगर सर, अंबेकर सर,सौ.मादसवार मॅडम व मुलुकपाडे सर यांनी परिश्रम घेतले.