
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कलंबर
हनमंत शिरामे
कलंबर :- दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने कै.बळीराम पाटील प्राथमिक शाळा,भोपाळवाडी ता.लोहा जि.नांदेड. या शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन समाज उन्नती शिक्षण संस्थेच्या सचिव मुद्रीकाबाई घोरबांड व मुख्याध्यापक माधव भोपाळे यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमात शाळेतील मुलींनी साड्या नेसून सावित्रीबाई यांचा वेश परिधान करून शाळेच्या मैदानात रांगोळी काढल्या काही मुलींनी सावित्रीबाई वर गीत गायले .शाळेतील शिक्षिका राजश्री कंधारे यांनी सावित्रीबाई यांचे कार्य गीत गाऊन सांगितले. मुख्याध्यापकांनी सावित्रीबाई यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
महिलांचा सन्मान- श्रीमती मुद्रीकाबाई घोरबांड, शाळेतील महिला कर्मचारी राजश्री कंधारे ताई व सुनिता मावशी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाला योगायोग ग्रामीण मराठी पत्रकार संघ,उस्माननगर चे अध्यक्ष श्री विठ्ठल ताटे व सहसचिव श्री सुर्यकांत मालीपाटील उपस्थित होते. त्यांचा पण सत्कार करण्यात आला.पत्रकार सुर्यकांत मालीपाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जिवनचरित्र बद्दल माहिती सांगुन LED TV द्वारे Video दाखवण्यात आला.