
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कलंबर
हनमंत शिरामे
कलंबर:- दिनांक 3 जानेवारी २०२२ रोजी संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर येथे,”सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरील कार्यक्रमास समाज उन्नती शिक्षण संस्थेच्या सचिव आदरणीय श्रीमती मुद्रिका बाई घोरबांड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले.
तसेच शालेय विद्यार्थिनी सवित्रीच्या लेकी यांनी पण प्रतिमेचे पूजन केले प्रस्तुत कार्यक्रमास समाज उन्नती शिक्षण संस्थेच्या सचिव, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राध्यापिका, अध्यापक व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री कराळे सर यांनी केले.आभारप्रदर्शन बी.एम.पानपट्टे सर यांनी केले.