
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व
प्रतिनिधी मोहन आखाडे
औरंगाबाद :- औरंगाबाद पोलिस दलातील सहायक फौजदार सुनील नारायणराव खांडरे हे ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी ३३ वर्षे पोलिस दलात सेवा बजावली. त्यांचा पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपायुक्त अपर्णा गीते, याप्रसंगी सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे, बालाजी सोनटक्के आणि सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
तर उच्च न्यायालय, औरंगाबाद यांच्या वतीने वकील संघाचे अध्यक्ष नितीन चौधरी, अमरजितसिंग गिरासे, अॅड. रामचंद्र पाटील (बार कौन्सिल) यांच्या हस्ते निवृत्त खांडरे यांचा सत्कार करण्यात त्या बद्ल सर्व समाजबांधव व मित्र मंडळ यांच्या तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या