
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
उमरा:- उमरा या सर्कलमधील रस्ते अतिशय खराब झालेले असून या परिसरातील जनतेला व वाहतुकीस गैरसोय होत आहे.तरी या कामात पुरवणी दुरूस्ती किंवा विशेष दुरूस्ती अंतर्गत कांजाळा ते डोलारा- पिंपळदरी-धनंज बु. फाटा ५कि.मी.रस्ता करणे अंदाजित रक्कम ७००लक्ष, कापसी बु. ते डोलारा ४ कि.मी. रस्ता करणे अंदाजित रक्कम ६००लक्ष, कुंभार गाव ते डोनवाडा फाटा २.५कि.मी.रस्ता करणे अंदाजित रक्कम ३५० लक्ष, राममा हातणी ते येळी ४कि.मी. रस्ता करणे अंदाजित रक्कम ६००लक्ष रस्त्याची दुरूस्तीची मंजुरी मिळण्याची विनंती भास्करराव पा. जोमेगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडे केली आहे.