
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- मुखेड तालुक्यातील हसनाळ प दे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.परिसरातील लोकांनी मोफत नेत्र तपासणी करून घ्यावी अशी सूचना हसनाळ गावाचे सरपंच श्री मारोती पंडीतराव नाईक यांनी दिली होती.त्यांच्या सुचनेनुसार दिव्या आॅप्टिकल यांच्याकडुन मोफत नेत्र तपासणि करण्यात आली यावेळी दिव्या आॅप्टिकलचे मालक दिलीप बाबुराव पांचाळ गावातील विलास बंडगर, महाजन नाईक,बालाजी नाईक,अनिल हसनाळकर तसेच तंटा मुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक ,जी प शाळेचे सहशिक्षक सचिन रामदिनवार सर, मानसपुरे सर, तूपदाळ गावाचे ग्रा.पं सदस्य ज्ञानेश्वर बेळे पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.