
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी :- लोहारा तालुक्यातील माकणी येथे बी.एस.एस. कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागांमध्ये दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी सर्टिफिकेट कोर्स इन फ्रेश वॉटर फिष कल्चर या कोर्सचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच एन रेडे साहेब व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जे.ई.एस. महाविद्यालय, जालना येथील प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट मेंबर डॉ.लक्ष्मीकांत शिंदे हे उपस्थित होते व प्रमुख उपस्थिती मध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मुंडे सर व प्राणिशास्त्र विभागातील
डॉ.एम एस निर्मळे मॅडम उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणिशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.एस.डी.कांबळे यांनी मांडले व या कार्यक्रमामध्ये डॉ.लक्ष्मीकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यामध्ये सरांनी विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी कोणते कोणते आपल्याला उद्योग करता येतील व त्या संदर्भातल्या वेबसाईट बद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमातील अध्यक्षीय समारोप यामध्ये प्राचार्य डॉ.एच.एन.रेडे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख
डॉ.एस.डी.कांबळे यांनी केले व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राणिशास्त्र विभागातील डॉ.एम.एस.निर्मळे मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये प्राणीशास्त्र विषयाचे विद्यार्थी तथा महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राणिशास्त्र विभागातील प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.