
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- येथील परमपूजनीय गोळवळकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्कार केंद्राचे मुख्याध्यापक दमन देगावकर,प्रमुख वक्त्या स्वाती जमदडवार तसेच प्रमुख उपस्थितीत कुलकर्णी स्मिता होत्या. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख वक्ते स्वाती जमदडवार यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकत, स्त्री शिक्षणाचे कार्य करताना सावित्रीबाईंना आलेल्या अडचणी आणि ज्योतीबांनी सावित्रीबाई दिलेली साथ आणि मार्गदर्शन किती मोलाचे होते याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षिय समारोपात दमन देगावकर यांनी शिक्षण ही अशी बाब आहे,जी आयुष्यभर कामी येते. शिक्षणामुळे मुलीच्या समस्या दूर झाले व प्रत्येक क्षेत्रात स्त्रीयापुढे आहेत. किमान मुलींनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेच पाहिजे असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन भानुदास शेळके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले .