
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
हदगाव :- हदगाव-हिमायतनगर मतदार संघातील कोळी येथे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर व हवामान तज्ञ पंजाबराव डक यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न झाला. यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर व पंजाबराव डक यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीथी दर्शवली. या कार्यक्रमाचे आयोजन मनाठा युवक काँग्रेसचे सर्कल प्रमुख तथा कोळी नगरीचे तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील कोळीकर यांनी केले होते.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री.आनंद भंडारे,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल पवार करमोडीकर,जिल्हा परिषद सदस्य केरबा सुर्यवंशी, कैलास पाटील नेवरीकर,सरपंच संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास चव्हाण, सरपंच प्रा.संजिव कदम, पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगांबर कदम, शंकरराव सुर्यवंशी मनाठकर, पत्रकार दिपक सुर्यवंशी व इतर मान्यवर उपस्थित होते.