
दैनिक चालु वार्ता
लघर मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
नवीन वर्ष लागल की आपण आपल्या घरातील जुने कॅलेंडर काढून नवीन वर्षाचे कॅलेंडर लावतो याच कॅलेंडर च्या माध्यमातून खूप वेगवेगळी माहिती पोचवण्याचे काम बेधडक रोखठक आदिवासी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. ह्या कॅलेंडरच्या माध्यमातून आदिवासी चालीरीती आदिवासी सण आदिवासी देव दैवत आपल्या पूर्वजांच्या आठवणी लोकांन पर्यंत कॅलेंडरच्या माध्यमातून पोचवण्याचे काम ही संघटना करत आहे. ह्या कॅलेंडरची अनेक ठिकाणाहून खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे याच्या वरून आदिवासी समाज आता खूप जागा झाला असून त्याला इतर ठिकाणी भटकवल जाणार नाही याची खात्री आता तरुण आदिवासी युवकाना वाटत आहे.
आदिवासी संस्कृतीची माहिती जमा करून पूर्ण विचार करून हे कॅलेंडर बनवलं आहे. यासाठी संघटनेचे संस्थापक आप प्रमोदजी गायकवाड, ऍड.कैलास वसावे, आप गजानन टोपले,आप अमोल टोपले,आप प्रतिभाताई चौरे,आप बालाजी गवळी,आप रमेश गवळी,आप खंडू गांगुर्डे ,आप प्रावीन मौळे आदी संघटनेच्या कार्यकर्त्यानि अफाट कष्ट करून माहिती जमा करून या कॅलेंडरची निर्मिती केली आहे.