
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
किनवट :- दि. ३ जानेवारी रोजी विद्येची जगत जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले व जयपाल सिंग मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी विद्यार्थ्यांनी बालिका दिन साजरा केला. यामध्ये हस्तकला रांगोळी व्यंगचित्रे अभ्यासक्रमातील नकाशे आकृत्या प्रत्येक वर्गातील हस्तकलेच्या माध्यमातून वर्ग सजावट रंगरंगोटी करण्यात आली.
एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल सहस्त्रकुंड च्या विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक वर्ग सजावट बालिका दिनानिमित्त वर्ग सजावट मध्ये वर्ग बारावा प्रथम व वर्ग अकरावा द्वितीय मान मिळवला. कनिष्ठ गटामध्ये वर्ग आठवा प्रथम तर वर्ग सातवा द्वितीय यांनी मान मिळवला, यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर उत्कृष्ट मनोगत व्यक्त केल्यामुळे रोहिणी तुमलवाड वर्ग अकरावी प्रथम मान मिळविला, अनिकेत बोंबलेवाड हा द्वितीय तर समीक्षा मडावी तृतीय मान मिळविला आहे, यांना पारितोषिक प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक उत्तरेश्वर निर्मल सर व आभार प्रदर्शन श्री.प्रफुल देवराय सर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष येथील प्राचार्य. अरुण मस्कर सर, प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गजानन वानोळे, दशरथ आंबेकर,विशाल भालेराव शाळेतील शिक्षक कर्मचारी प्रविण तोडमल सर, सहाय्यक प्राध्यापक जाधव मॅडम, श्री राहुल सावंत सर, श्री अजय गायकवाड सर, श्री कन्नाके सर, श्री कदम सर, श्री पाचपुते सर, श्री बोंतावार सर श्री सुरज राठोड यांची उपस्थिती होती.