
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज :- मौ.पेठवडज ता.कंधार जि.नांदेड येथील नदीतील वाढलेल्या बेसरम नावाच्या वनस्पती मुळे व जागो जागी डवके साचलेल्या पाण्या वर डांसाची उत्पती झालेली असुन त्या डास चावल्यामुळे हतीपायरोग व अकवूधी असे रोगाची लागण झालेले अनेक नागरीक आहेत. या हतीपाय रोग ग्रस्थ व्यक्तींना पायाला व हाताला सुज येते. तसेच रात्री ताप येतो त्यामुळे त्याना शरीर कष्टाचे काम होत नाही. अशा व्यक्तींना जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी दरमहा 5000 रुपये मानधन चालु करण्यात यावे असे विनंती पत्र जाधव व्यंकटी गोविंद,कंधारे पांडुरंग व्यंकटी, वडजे माधव रामराव यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्याकडे केले आहे.