
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व
प्रतिनिधी मोहन आखाडे
औरंगाबाद :- औरंगाबाद फिर्यादी नामे अशोक अंकुश गायकवाड वय-28 वर्ष व्यवसाय- खा.नोकरी रा.प्लॅट नं.03 त्रिर्मुती कल्याणेश्वर कॉलनी भवानीनगर औरंगाबाद यांनी दिनांक 01/01/2022 रोजी 18.00 ते 18.30 वाजेचे दरम्यान मलबार गोल्ड & डायमंडचे दुकान मोढांनाका औरंगाबाद. ह्या दुकानातून सोन्या चांदीचे दागदागिणे चोरीस गेले बाबत पोलीस स्टेशन जिन्सी औरंगाबाद शहर येथे दिलेल्या प्रथमखबरी वरून पोस्टेला अज्ञात आरोपी विरूध्द गुरनं 03/2022 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
मा.पोलीस निरिक्षक श्री व्यंकटेश केद्रे पोस्टे जिन्सी यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे विशेष तपास पथकाचे पोउपनि गोकुळ ठाकुर यांनी गुप्त बातमीदाराचे बातमी नुसार, नमुद ज्वेलरीचे दुकानातील CCTV फुटेजचे आधारे, तसेच अॅटो रिक्षाचालक यांचेकडील माहीतीचे आधारे मलबार गोल्ड & डायमंडचे दुकान मोढांनाका औरंगाबाद. ह्या दुकानातुन ज्वेलरी चोरणारी महिलेचा तात्काळ शोध घेवून तिचा अवघे 48 तासात शिताफिने ताब्यात घेवून विश्वासात घेवून विचारपुस केली असता.
तिने गुन्हा केल्याचे कबुल केले त्यावरून तिस अटक करण्यात आली. अटकेत असतानां तिने वर नमुद गुन्हयात चोरलेला मुद्देमाल काढुन दिला आहे. नमुद महिलेस तिचे नाव पत्ता विचारता तिस तिचे नाव शबाना बेगम उर्फ शब्बो पती शेख जलील वय-30 वर्ष रा.घर नं.14-1-227 गल्ली नं.05 निजामगंज कॉलनी भवानीनगर औरंगाबाद. असे सांगितले आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि अंनता तागंडे हे करीत आहे.
औरंगाबाद शहर पोलीसा कडुन शहरातील सराफी, कापड विक करणारे व्यापारी, व इतर सर्व व्यापारी बंधु यांना आवाहन करण्यात येते की आपले दुकानात संशयीत रित्या महिला बुरख्यामध्ये येईल तीची खात्री करावी जेणेकरून पुन्हा चोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सदरची कामगीरी मा.श्री डॉ. निखिल गुप्ता सो, पोलीस आयुक्त साहेब, मा. श्री दिपक गि-हे सो पोलीस उप आयुक्त परि-2, मा.श्री.निशीकांत भुजबळ सो, सहाय्यक पोलीस आयुक्त सिडको विभाग औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री व्यकटेश केद्रे, विशेष पथकाचे पोउपनि गोकुळ ठाकुर सहाय्यक फौजदार संपत राठोड, पोलीस नाईक नंदूसिगं परदेशी, सुनिल जाधव, नंदलाल चव्हाण, पत्नीस अमंलदार संतोष बमनात यांनी पार पाडली.