
दैनिक चालु वार्ता
सातारा : धम्मामध्ये चिवरचे महत्व आहे. त्यामुळे ज्यांनी धारण केले आहे.त्यांच्या पुढे सर्वजण नतमस्तक होतात.ध्यान धारणाही गरजेची आहे. तेव्हा नवनवीन संकल्पना राबवून धम्मचळ गतिमान केली पाहिजे. असे प्रतिपादन भन्ते अनिरुध्द यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने जावली तालुकास्तरीय ८ वी बौद्ध धम्म परिषद व दीक्षा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तेव्हा भन्ते अनिरुद्ध मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष तात्या गाडे होते.
लहान व मोठ्या गटातील श्रामणेर दिंपकरजी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत धम्म कार्य करणार असल्याचे अनेक उदाहरणांसह स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांनी धम्म वाढीसंदर्भात मौलिक असे मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास केंद्रीय सचिव जगदीश गवई, नाथा ममता आगाणे, महाराष्ट्र सचिव सुशील वाघमारे व दैवशीला गायकवाड,मुंबई प्रदेश अध्यक्ष उत्तम मगरे,सचिव स्वाती गायकवाड, जिल्हाध्यक्ष व्ही.आर.
थोरवडे,जिल्हा उपाध्यक्ष अरविंद बारसिंग, जिल्हा सचिव विद्याधर गायकवाड,संरक्षण उपाध्यक्ष दादासाहेब भोसले,संरक्षण सचिव भागवत भोसले,जिल्हा उपाध्यक्षा डॉ.मीनाताई इंजे,पर्यटन सचिव यशवंत अडसूळ,महाबळेश्वर तालुका सचिव अभिजित भालेराव, वंचितचे प.महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हा सचिव सुनील कदम, खटाव तालुका महासचिव कृष्णत केंजळे, जावली तालुका वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते,भन्ते धम्मप्रियजी, अनिल वीर,दिलीप सावंत,गौतम भोसले, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. धमदीक्षा श्रीमंत घोरपडे यांनी दिली.मोहन खरात यांनी प्रास्ताविक केले.तालुका उपाध्यक्ष भीमराव परिहार यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.
फोटो : भन्ते अनिरुध्द मार्गदर्शन करताना शेजारी ,मान्यवर व श्रामणेर.