
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना पिक कर्ज न देणाऱ्या बँकेच्या विरोधात या मोर्चात घोषणाबाजी देण्यात आल्या आणि ढोल-ताशा ने मुखेड शहर दणाणून गेले. रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा जिल्हाध्यक्ष बालाजी पा. ढोसणे यांच्या नियोजनातून हा मोर्चा मोठ्या संख्येने संपन्न.बँके समोर ठिय्या करत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या भावना या ठिकाणी बँकेच्या विरोधात व्यक्त केल्या.
यावेळी जि.प सदस्य दशरथ लोहबंदे, डॉ.रणजित काळे, नगरसेवक विनोद आडेपवार, विजय किनाळकर ,गोविंद घोगरे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे ,मराठवाडा महिला अध्यक्ष संगीता कोल्हे, ओबीसी जिल्हाध्यक्ष बालाजी पांचाळ, मुखेड तालुकाध्यक्ष नवनाथ तारदकर, शहराध्यक्ष संगीत जाधव, गोविंद घोगरे, मैनु शेख ,स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, प्रदीप इंगोले, प्रभाकर कागदेवाड आणि तालुक्यातील शेतकरी, महिला मोठ्या प्रमाणात इत्यादी उपस्थित होते.