
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा शहर व परिसरातील नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क चा वापर करावा तसेच ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांनी लस घ्यावी. कोरोना नियमांचे पालन हेच- सुरक्षित आपले जीवन त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन लोह्याचे कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी केले आहे. जुन्या लोह्यात पोलीस सप्ताह तसेच जिजाऊ ते सावित्री -सन्मान महाराष्ट्राच्या लेंकीचा या उपक्रमा अंतर्गत शिवछत्रपती प्राथमिक -माध्यमिक विद्यालयात १५ते १८वर्षा च्या विद्यार्थी लसीकरणाची शुभारंभ पोलीस निरीक्षक संतोष तांबे व संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दामोदर वडजे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हणमंत पवार, वैदयकीय अधिकारी सौ डॉ. रूबी सय्यद, डॉ.इस्माईल शेख, गजानन मोरे, भाग्यश्री डोळस, तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख आर आर पिठ्ठलवाड, प्रसिद्ध निवेदक बी एन गवाले, पोलीस जमादार श्री गीरे, यासह मान्यवर उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी पोलीस वर्षापन दिनानिमित्त पोलीस ठाण्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वांनी काळजी घ्यावी मास्क अनिवार्य असून लसीकरण पूर्णतः झाले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना सांगावे तसेच कोरोना नियमांचे पालन हेच सुरक्षित जीवन असा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
आरंभी राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पोलीस निरीक्षक तांबे, संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील पवार यांनी पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री.वडजे यांनी श्री तांबे यांचे तसेच कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील यांचा मुख्याध्यापक हणमंत पवार यांनी सत्कार केला. तसेच आर आर पिठ्ठलवाड यांचा तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक वडजे यांनी जिजाऊ ते सावित्री -सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा या उपक्रमाची माहिती दिली निवेदन श्री पिठ्ठलवाड यांनी तर आभार बी एन गवाले यांनी केले.