
दैनिक चालु वार्ता
सिडको प्रतिनिधी
विक्रम खांडेकर
नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील सामाजिक शास्त्रे संकुलात चालत असलेल्या स्त्री अध्ययन केंद्राच्या वतीने आज दिनांक ०४.०१.२२ रोजी दुपारी दोन वाजता सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक ‘डॉ. घनश्याम येळने ‘हे होते तर. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आसाम विश्वविद्यालय येथील समाजकार्य विषयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. गंगाभूषण मोलांकल हे होते.
प्रा.डॉ. गंगाभूषण मोलांकल यांनी ऑन लाइन व्याख्यानाद्वारे सावित्री बाई फुले यांचे जीवन कार्य व सद्यस्थितीत महिलाचा सामाजिक दर्जा, महिला – पुरुष समानता, व महिलांच्या हक्का विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. या वेळी सामाजिक शास्त्र संकुलातील प्रा. उषा सरोदे, प्रा डॉ. नंदकुमार बोधगीरे, प्रा.डॉ. प्रमोद लोणारकर, प्रा.डॉ. बाबुराव जाधव, डॉ. तातेराव पवळे, डॉ. रवी सूर्यवंशी, डॉ. नितीन गायकवाड, उपस्थित होते ,या कार्यक्रमाचे आयोजन स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालिका प्रा.डॉ. शालिनी कदम, यांनी केले.
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.निता कळसकर, प्रा.गजानन इंगोले, प्रा.शशिकांत हाटकर यांनी परिश्रम घेतले. या विशेष व्याख्यानाला अनेक विद्यार्थ्याची ऑन लाइन उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. शशिकांत हाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालिका प्रा.डॉ. शालिनी कदम यांनी मानले.