
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी
सुशिल घायाळ
मंठा :- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल करून विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालण्याचा निर्णय २८ डिसेंबर रोजी विधी मंडळाच्या अधिवेशनात घेण्यात आला. मा.कुलपतींच्या अधिकारात व शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप करण्याच्या या निर्णया विरोधात अभाविप मंठा शाखेच्या वतीने स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी SFS जिल्हाप्रमुख सचिन बोराडे,शहरमंत्री संदिप गायकवाड,श्रीनाथ आघाव,निलेश बोराडे,मयुर देशमुख,निवास राठोड,अर्जुन बोराडे,विनायक पानझाडे व इतर विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.