
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधि वडेपुरी
मारोती कदम
सुनेगाव :- सुनेगाव येथील प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यालय या शाळेत जिजाऊ ते सावित्रीच्या लेकी या उपक्रमाअंतर्गत दुसर्या दिवशी आरोग्य सेविका एस.वाय.पंडित.डॉ.एस.के. बुलबुले व आरोग्य सेवक आर.डी.कसबे ,आशा वर्कर्स सी.बी.जाधव. मदतनीस एस.आर.येरमुनवाड उपस्थित होते. 15_ते18वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोणाची कोव्हॅक्सीन लस देण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणेश वाघमारे, संग्राम चोपवाड, बेग सर ,कांबळे सर, आदी कर्मचारी उपस्थित होते.