
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- औरंगाबाद मधील जालनारोङ स्टंटबाज प्रकरणातील प्रियकराला जिन्सी पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली आहे.’तङप’ या सिनेमाचा ट्रेलर बघून मिञांनी दिलेले चॕलेंज सुरजने स्विकारले. प्रियसीला गाड़ीवर समोरच्या बाजुला बसवून किसींग व अश्लील चाळे करत हा तरुण धोकादायकपणे वाहतूकीचे नियम पायदळी तुङवत, स्वतःच्या व दुसऱ्यांच्या जीवाला धोका होईल अशी बेदखलपणे गाङी चालवत होता. हा व्हिडिओ सोशल मिङीयावर व्हायरल झाल्यानंतर, विविध समाज माध्यमातून टीकेची झोङ उठली. पोलिसांनी तात्काळ आपल्या तपासाची चक्रे फिरवीत. लगेचच या तरुणाचा शोध सुरु केला. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण अपेक्स हॉस्पिटल जवळ असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना मिळाली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले . सुरज गौतम कांबळे (वय-२४, रा.बीडबायपास,अलोकनगर) असे या तरुणाचे नाव आहे .
त्याची चौकशी केली असता त्याने, ३१ डिसेंबर च्या रात्री त्याने मिञांसोबत सिनेमाचा ट्रेलर पाहिला. मिञांनी त्याला प्रेयसी सोबत “किसींग स्टंट” करण्याचे चॕलेंज दिले व त्याने ते स्विकारले. लगेचच प्रेयसीला बोलवून घेत त्याच वेळी रात्री क्रांतीचौक ते सेव्हनहील आणि पुन्हा सेव्हनहील ते क्रांतीचौक असा “किसींग स्टंट” केला. या व्हिङीओने सोशल मिङीया वर प्रचंड व्हायरल झाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावरुन त्याच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व काही तासांतच त्याला बेङ्या ठोकण्यात आल्या. चौकशी दरम्यान त्याने सदरील गैरकृत्य केल्याची कबूली दिली.
सदरील कामगिरी पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे आणि जिन्सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंता तांगडे, हेड कॉन्स्टेबल जगताप, संतोष बमनावत आणि बावीस्कर यांनी यशस्वीपणे पार पाडली. सुरज शहरातील सुतगिरणी चौकातील एका कापङ दुकानात सेल्समन आहे. तो एम.ए.चे शिक्षण घेतो. त्याचे वङील बांधकाम ठेकेदार आहेत . गुन्हा करतांनी सहभागी असलेली त्याची प्रेयसी ( वय-१९ ) ही महाविद्यालयात शिक्षण घेते, ते एकमेकांचे नातेवाईक असून लग्न करणार आहेत अशी माहिती कुटूंबातील सदस्यांनी दिली .