
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड :- येथील विष्णूनगर मध्ये सन २०२० गेले २०२१ गेले २०२२आले परंतु ड्रेनेज लाईनची अद्यापही कुठल्याही प्रकारची दुरूस्ती करण्यात आली नाही. तसेच घाण पाणी रस्तावर साचत असून त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरते त्यामुळे जगणे असह्य होऊन गेले आहे. लहान मुलांना व वयस्कर नागरीकांना साथीचे रोग होत आहेत. त्यातच कोरोना संसर्ग चालू असल्यामुळे अजून संसर्ग घाणीमूळे वाढण्याची शक्यता जास्त असल्याने महानगरपालिका नांदेड यांनी ड्रेनेज लाईनचे काम लवकर करून द्यावे अन्यथा सामाजिक कार्यकर्ते राहूल साळवेसह विष्णुनगर परीसरातील इतर सर्व नागरिक यापुढे शासनाचा कोणताही कर भरणार नाही.
कारण विविध कर भरूनही आम्हाला दवाखान्यात दाखल होऊन लाखो रुपये खर्च करून जीवन जगावे लागत असेल,तसेच आमचे आरोग्य धोक्यात येत असेल आम्हाला कुठल्याच सोई सुविधा मिळत नसतील तर मग विविध करांच्या रूपात शासनास रक्कम भरून आम्हाला फायदा तरी काय? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे यांनी मांडला आहे तसेच ते पुढे म्हणाले की.आमचे आरोग्य धोक्यात आणनार्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे आणि लवकरात लवकर ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण केले पाहिजे असे दैनिक चालू वार्ताशी कळविले आहे.