
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पारनेर :- पारनेर तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून ओळख असलेल्या श्री हरेश्र्वर विद्यालय कर्जुले हरेश्र्वर येथे आज दि.०५जानेवारी२०२२रोजी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग व केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.या निमित्त झालेल्या कार्यक्रमात भगवद्गीता पठण झाले. अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचा जिवनपट मधुकर बर्वे सर यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला. माईंना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. आरोग्य सेवक श्री अशोक घडेकर सरांनी विद्यार्थ्यांना लसीकरणाविषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव शिवाजीराव आंधळे उपस्थित होते.
आरोग्य उपकेंद्र कर्जुले हरेश्र्वर येथील (C.H.O.) समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला बांडे मॅडम, आरोग्य सेवक श्री.अशोक घडेकर, आरोग्य सेविका डॉ.अर्चना ढुस, श्रीमती वैशाली दाते (आशा सेविका), श्रीमती राधा जाधव (आशा सेविका), श्रीमती उज्ज्वला रोकडे (मदतनीस) यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. श्री.हरेश्र्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर, मधुकर बर्वे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.