
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी विष्णुपुरी नांदेड
बालाजी पाटील गायकवाड
नांदेड :- आज दि.04.01.2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांमध्ये, ज्या विद्यार्थ्यांनी पीएचडी ला प्रवेश घेतला आहे. ते सर्व विद्यार्थी आज, विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ,विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी कुलगुरू साहेबांना निवेदने देण्यासाठी विध्यापिठाच्या परिसरात विध्यार्थी जमले आहेत. मागच्या काही दिवसात बरेच निवेदन देऊन देखील,माननीय कुलगुरू साहेबांनी त्यांची दखल घेतली नसल्यामुळे, आज काही मागण्या घेऊन विद्यार्थी धरणे आंदोलनास बसले आहेत. युवा संघर्ष शक्ती विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाची योग्य दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कंधारकर, रवींद्र तातू, संजय चव्हाण, वाघमारे सिद्धार्थ, महेश जाधव, कैलास शिंदे, संघरत्न आठवले, राष्ट्रपाल हातोडे, नीतीन गरड, दीपक पुरी, भागवत लाड, काळे विशाल, अभिजित लोने, मुबिन अन्सारी या विध्यार्त्यांनी इशारा दिला आहे.
विद्यार्थी खालील प्रमाणे मागण्या करत आहेत.
१) पीएचडी कोर्स वर्क पेपर ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारात उपलब्ध करून घेण्यात यावी.
२) 2021 परीक्षेतील प्रवेशासाठी वापरण्यात येणारे आरक्षण कोणत्या मापदंडवर ठरविण्यात आले आहे ते पुराव्यासह देण्यात यावे.
३) ज्या संशोधन विद्यार्थ्यांना कुठलेही संशोधन अधीछात्रवृत्ति नाही अशा विद्यार्थ्यांना स्वामी रामानंद तीर्थ अधिछात्र देण्यात यावी.
आंदोलनाचे विशेष म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत.हमारी मांगे पुरी करो,वर्णा हमें कुलगुरू करो… अशा प्रकारचे फलक लावून घोषणाबाजी करण्यात आली.