
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
नांदेड :- येथील सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने एक सेववृत्ती। समर्पित व्यक्तिमत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे.खडतर परिस्थितीशी संघर्ष करत हजारो अनाथ बालकांना त्यांनी मायेचा आधार दिला.अनाथांची माय होऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी सिंधुताई प्रामाणिकपणे काम करत राहिल्या.
जगभरात त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली.तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेला त्यांचा हा प्रवास आज थांबला असला तरी त्यांनी सुरू केलेला सेवायज्ञ कायम तेवत ठेवणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन यावेळी चव्हाण साहेबांनी केले आहे.