
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
ग्राहक चळवळीत मोठ्या संख्येने कार्यरत असलेली ग्राहकतिर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रेरणेने संपूर्ण भारतात व राज्यात सतत ग्राहकांसाठी कार्यरत असलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेत गेली २० वर्षांपासून अधिक काळ हे ग्राहक संघटन, प्रबोधन व मार्गदर्शन करण्यासाठी निरलस व निरपेक्ष भावनेने कार्यरत असलेले सतीश भाऊराव माने मदनसुरीकर यांची औरंगाबाद विभाग अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्तीपत्र राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड, राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्य कमिटी विभाग कार्यकारिणीच्या सूचनेनुसार व मतानुसार माने यांची नियुक्ती करण्यात आले असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
या नवनिर्वाचित औरंगाबाद विभाग अध्यक्ष सतीशराव माने मदनसुरीकर यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड, लातूर जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सहसंघटक सौ.मेघाताई कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्रे देऊन यथोचित सत्कार ही करण्यात आला. यांच्या निवडीचा बद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.