
दैनिक चालु वार्ता
कंधार -लोहा विशेष प्रतिनिधी
ओंकार लव्हेकर
लोहा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरणवाडी तालुका लोहा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमास गावचे सरपंच ताणाजी जाधव हे उपस्थित होते त्याचबरोबर शालेय समितीचे अध्यक्ष यादवराव मोहटे व समिती सदस्य उपस्थित होते. सदरील कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री मोरे ज्ञानोबा उत्तमराव व सहशिक्षक बस्वदे शंकर मोहनराव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले.
पूजनानंतर मी सावित्री बोलतेय या या विषयावर शाळेतील विद्यार्थिनी सृष्टी जाधव, विश्रांती जाधव, जीविका जाधव ,श्रावणी जाधव, वीराने जाधव, माधवी लाडेकर ,वेदिका जाधव या विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर भाषणे केली. कार्यक्रमास विलास जाधव शिवाजी जाधव, प्रभावती जाधव, कलावती जाधव, या महिला व व शाळेतील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. गावातील मुख्य रस्त्याने प्रभात फेरी काढून मुलीच्या शिक्षणाविषयी जनजागृती करण्यात आली. सर्व मुलींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रम संपल्यास बस्वदे सरांनी आभार मानले.