
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पुणे :- राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षारक्षकांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा. अशी मागणी महाराष्ट्र सुरक्षारक्षक कामगार अधिकार संघटनेचे नेते तुकाराम कुंभार यांनी केली आहे. दरम्यान त्यांनी असे म्हटले आहे की, सुरक्षा रक्षक मंडळ नियमाप्रमाणे सुरक्षारक्षकांची चाचणी, मैदानी परीक्षा व इतर प्रशिक्षण देऊन मंडळात नोंदणी करून घेते व नोंदणीकृत आस्थापनेतच सुरक्षारक्षकांना वितरित करण्यात येते. परंतु मंडळातील काही मुठभर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सुरक्षारक्षकांना ड्युटी मिळत नाही, किंवा नोंदीत अस्थपणा असूनही त्या ठिकाणी ड्युटीला पाठवले जात नाही.
तरी हि चुक सुरक्षारक्षकांची नसुन, मंडळातील अधिका-यांची चुक आहे.याला जबाबदार मंडळातील अधिकारीच जबाबदार आहेत.असा आरोप हि तुकाराम कुंभार यांनी केला आहे. दरम्यान आस्थापनेत कमी होणे, नवीन नोंद न घेणे, काही कारणास्तव आस्थापनातील सुरक्षारक्षकांना कमी करणे, असे प्रकार वारंवार मंडळात घडत आहेत. हे सर्व मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच होते. असा आरोप देखील कुंभार यांनी या प्रत्रकात केला आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांना विनाकारण वेटिंगवर ठेवली जाते. त्याचा परिणाम म्हणून सुरक्षारक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते.म्हणुन त्यामुळे अशा परिस्थितीत मंडळाने त्यांना बेरोजगार भत्ता देणे आवश्यक आहे. तो त्यांना देण्यात यावा.
अन्यथा त्यांना ड्युटी उपलब्ध करून देण्यात यावी.दरम्यान पुणे मंडळात माहे १ एप्रिल २०२२ पासून होणारी वेतन वाढ हि सुमारे ३५००/- रुपये करण्यात यावा. पेमेंट ऑफ वेजेस ॲक्टनुसार वाढीव वेतन व भत्ते लागू करण्यात यावेत. तरी मंडळाने त्या वाढीव वेतनामध्ये अर्जितरजा वेतन प्राप्त अधिनियम (१९३६) नुसार सर्व तरतुदी आणि नियम हे सर्व सुरक्षारक्षकांठी बंधनकारक आहेत. मंडळाने पेन्शन फंड किंवा प्रोव्हीडेन्ट फंड यामध्ये किंवा विमा योजना अंतर्गत कोणतीही रक्कम भरली असल्यास तसेच भरलेल्या रकमेतील व्याज सुरक्षारक्षकांना त्या तरतुदीनुसार देणे बंधनकारक आहे.
प्रत्येक नोंदणीकृत सुरक्षा रक्षकाला मंडळाने निर्देशित केलेल्या उपखंड(३०) अंतर्गत वर्षातून चार सुट्ट्या वेतनासह दिल्या पाहिजेत, परंतु त्या दिवशी जर सुरक्षारक्षकांनी ड्युटी केल्यास त्या दिवशीचा पगार उपखंड (२०) मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जादा दराने देण्यात यावा. वेतन व कायदेशीर सवलती मंडळाने सुरक्षारक्षकांना देण्यात याव्यात यामध्ये प्रामुख्याने सानुग्रह अनुदान, उपदान, भरपगारी रजा, भरपगारी सुट्ट्या, याचा प्रामुख्याने समावेश आहे. सण २०१९ साली झालेल्या आॅनलाईन भरतीचा निकाल लवकरच नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात यावा.अशी मागणी हि महाराष्ट्र सुरक्षारक्षक कामगार अधिकार संघटनेचे कामगार नेते तुकाराम कुंभार यांनी मुंबई (सानपाडा)/पुणे मंडळाचे अध्यक्ष/सचिव यांच्याकडे केली आहे.