
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे.
देगलूर :- तालुक्यातील येरगी येथे 3 जानेवारी रोजी युवा सरपंच संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र तपासणी शस्त्रक्रिया,अपेंडीक्स, हर्निया,हायड्रोसिल शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 612 जणांची तपासणी करून त्यापैकी 110 नागरिकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.
सदरील शिबिराचे उद्घाटन माजी आमदार सुभाष साबणे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य व दिव्यांग प्रकोष्ठ राज्य अध्यक्ष रामदास पाटील,भाजप तालुका अध्यक्ष शिवाजीराव कनकंटे,अनिल पाटील खानापूरकर,मरखेल चे पोलीस निरीक्षक अनिल चोरमले,डॉ.आर.एच.शेख,डॉ.उदय पाटील,डॉ.कपिल एकलारे,डॉ.रवींद्र भालके,डॉ.संजय लाडके आदी उपस्थित होते.
शिबिराच्या या चौथ्या वर्षी येरगी परिसरातील एकूण 15 गावातील लोकांनी याचा लाभ घेतला. शिबिराची सुरुवात धन्वंतरी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. सकाळी 11 ते 5 पर्यंत 612 नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यापैकी एकूण 87 रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी तर 23 रुग्णांची अपेंडीक्स, हर्निया व हायड्रोसिल शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. नेत्र शस्त्रक्रियेसाठी उदयगिरी लायन्स नेत्रालय उदगीर येथे पाठवण्यात आले तर उर्वरित 23 जणांना देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सदरील शिबिरासाठी उदयगिरी लॉयन्स नेत्रालयाचे डॉ.सचिन निलंकर, डॉ.बालाजी पांढरे,डॉ.रवींद्र भालके,डॉ.संजय लाडके,वैद्यकीय अधिकारी डॉ.उदय पाटील,डॉ.किरण ठाकरे आदींनी रुग्णांची तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी निवड केली. सदरील कार्यक्रमात देगलूर येथील महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी,भाजपचे शिवराज पाटील, दिगंबर कौरवार,कृउबा समितीचे बाबू पाटील खुतमापूरकर,रमेश पाटील,ऍड.रवी पाटील, यादवराव देसाई,नारायण पाटील, अवधूत भारती, सचिन पाटील, विवेक पडकंठवार,गंगाधर पाटील कारेगावकर,माजी सरपंच नागनाथ पाटील,चेअरमन प्रभू चेंडके,उपसरपंच बालाजी तलारवार, ग्रामपंचायत सदस्य अशोक बरसमवार, विश्वनाथ बागेवार,अशोक वाघमारे,सुरेश सोमावार,गजानन सूर्यवंशी,पुंडलिक वाघमारे,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर माणिक कोकले यांनी केले तर आभार संतोष पाटील यांनी मानले.
सदरील आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील मित्रमंडळाने परिश्रम घेतले.
*फोटो कॅप्शन*
1)मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन करताना माजी आमदार सुभाष साबणे,भाजप जिल्ह्यध्यक्ष व्यंकटराव पाटील,रामदास पाटील,डॉ.आर.एच.शेख,डॉ.लाडके व अन्य.
2)रुग्णांची तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी
3)शस्त्रक्रियेसाठी उदगीर व देगलूर येथे पाठवण्यात आले.