
दैनिक चालु वार्ता
भूम तालुका प्रतिनिधि नवनाथ यादव
भूम:- सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील दरोडेखोरांनी हैदोस घातला असून दाम्पत्यावर धारदार शस्त्राने मारहाण करत सोन्याचे दागिन्यांसह रोकड लुटून नेली. तर गावात अन्य दोन ठिकाणी घरफोडी करून दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केला.या घटना तालुक्यातील आष्टा येथे मंगळवारी दि(४) पहाटे २ ते ३ या दरम्यान घडली.यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी दरोडेखोरांना तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.
आष्टा येथील रहिवासी विक्रम गोवर्धन शेळके हे आपल्या घरी आपल्या कुटुंबीयांसोबत झोपले होते. दरम्यान, मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी गेटवरून उड्या मारून आत प्रवेश केला. दाराचे कुलूप तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला.दरवाजा उघडल्याचा आवाज येताच घरात झोपलेले विक्रम शेळके हे जागे झाले. यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात जंबियाने वार केला. यात गंभीर जखमी होऊन खाली कोसळले.
गावातील बिभीषण गिलबिले यांच्या घरात घुसले होते.त्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या घरी कोणीच नसल्यामुळे किती मुद्देमाल चोरीला गेला याची माहिती मिळू शकली नाही. बाबासाहेब गिलबिले यांच्या घरामध्येहि चोरट्यांनी चोरी केली आहे.ते खोलीत एकटे झोपले होते.बाहेरील दरवाजाची कडी तोडून चोरट्याने आत प्रवेश केला.बाबासाहेब गिलबिले झोपी गेल्याचा फायदा उचलत कपाटातील दागिने घेऊन पळ काढला आहे. या घटनेची माहिती कळताच जवळा पोलिस व परंडा ठाण्याचे पोलिस अधिकारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेले विक्रम शेळके व त्यांची पत्नीचा बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विक्रम शेळके यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.त्यांच्या पत्नीवर याच दवाखान्यात उपचार सुरू आहेत.या घटनेची भुम व परंडा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून,दरोडेखोरांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. महिलेची बोटे तुटून पडले दरोडेखोरंच्या आवाजाने शेळके यांच्या पत्नी जाग्या झाल्या.यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील दागिने काढून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिकार केला.यावेळी दरोडेखोरांनी त्या महिलेवर ही धारदार शस्त्राने वार केला.यात महिलेचे डाव्या हाताचे मधले बोट तुटून बाजूला पडले. यावेळी दरोडेखोरांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडून कपाटातले सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.