
दैनिक चालू वार्ता
मोलगी प्रतिनिधी
रविंद्र पाडवी
अक्कलकुवा :- क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेची मागणी निवेदन नायब तहसीलदार गांगुर्डे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले कि, अक्कलकुवा तहसील कार्यलयात सन 2016-2021 च्या ऑक्टोबर महिन्यापर्यत निस्वार्थीपणे आपले कर्तव्य पार पाडणारे तालुका व्यवस्थापक माकत्या दमन्या वसावे यांना काही कारण नसताना त्यांना तालुका व्यवस्थापक या पदावरुन सेवा समाप्तीच्या करण्याचे आदेश देण्यात आले आहे. वास्तविक परीस्थिती पाहता दिनांक 28 /12/2021 रोजी श्री.माकत्या वसावे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा यांच्याकडे लेखी तक्रार देऊन त्यांच्या विरोधात खोट्या स्वरूपाची तक्रार नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.ॲड. के.सी .पाडवी सो. यांच्याकडे दिनांक ०८/१०/२०२१ रोजी खोटी व बनावट तक्रार दाखल केली होती.त्या तक्रारी अर्ज अनुषंगाने जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी दिनांक २०/१०/२०२१ रोजी त्यांना सेवा मुक्त केले असल्याचे बाब समोर आली आहे.
एकंदरीतच परिस्थिती पाहता, त्यांच्या तक्रारी अर्जाचे अवलोकन केले असता ज्या तक्रारदाराने ऑक्टोबर महिन्यात तक्रार दाखल केली त्यांना मंजूर वनदावे मे २०२१ महिन्यातच देण्यात आले असल्याचे त्यांच्या तक्रारी अर्जावरून दिसून येत आहे व तेही संबंधीत गावाचा तलाठी यांच्यामार्फत वाटप करण्यात आले आहे. वन दावे वाटप करण्यात आले होते. त्यात श्री.माक्त्या वसावे यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध आलेला दिसून येत नाही.असे असताना पाच वर्ष निस्वार्थी पणे आपले कर्तव्य पार पाडण्याऱ्या श्री माक्त्या वसावे यांना तडकाफडकीने पदावरून काढण्यात आले.
श्री.माक्त्या वसावे यांचा खरोखरच वन दावे वाटपात संबंध आला आहे का? संबंधित गावाचा तलाठी यांच्या मार्फत वनपट्टे वाटप करण्यात आले होते तर श्री.माक्त्या वसावे यांनी पैश्याची मागणी कधी व कोणाकडे केली व त्यांचा संबंध कसा आला ? ज्या दिवशी पैश्याची मागणी केली त्या दिवशी का तक्रार करण्यात आली नाही. त्यांच्या विरोधात करण्यात आलेली कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन ज्यांनी खोटी तक्रार दाखल केल्याने श्री.माक्त्या वसावे यांना सदरील पदावरून काढण्यात आले आहे.खोट्या तक्रारीच्या आधारवर त्यांना काढण्यात आले आहे.
विशेष म्हणजे महसूल दिनानिमित्त्ताने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अक्कलकुवा तहसीलदार सचिन म्हस्के यांच्या हस्ते दिनांक १ ऑगस्टला तालुका व्यवस्थापक माकत्या वसावे यांचा गौरव करण्यात आला होता व त्यांनी सदर पदावर कार्यरत असतांना सर्वसामान्य जनतेला आपलेपणाची वागणूक देत नेहमी लोकांना मार्गदर्शक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती असे असतांना त्यांच्यावर अचानकपणे करण्यात आलेली कार्यवाहीने आदिवासी समाजात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे श्री. माकत्या वसावे यांना तात्काळ सेवेत घेण्यात यावे व खोटी तक्रार दाखल करुन त्यांना बदनामी केल्याप्रकरणी व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणल्या प्रकरणी नुकसान भरपाई देखील त्यांच्याकडून वसूल करण्यात येवून पालकमंत्री यांच्याकडे खोटी तक्रार केल्याप्रकरणी त्यांचा विरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास येत्या ८ दिवसांत तहसील कार्यालय अक्कलकुवा यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपले प्रशासन जबाबदार राहील याची सक्त नोंद घेण्यात यावी. यावेळी नायब तहसीलदार गांगुर्डे यांना निवेदन देताना क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय तडवी जिल्हा सचिव विनोद वसावे ,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष शब्बीर मक्राणी ,जिल्हा युवाध्यक्ष अफजल मक्राणी ,अर्जुन पाडवी ,अमजत पठाण, रविदास तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.