
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
गेली अनाथाची माय
पडली लेकरं उन्हात ,
आयुष्याच दुःख
गेली घेऊन मनात
लेकरांच्या हिता साठी
अख्खं आयुष्य झिजली ,
माय सिंधुताई ची आज
प्राण ज्योत ही विझली
काटे तुडवत चाले
पाय तरी ना थकले ,
आले संकट अपार
नाही सत्कार्य रुकले
माय जगात हिंडली
नाही पदर पडला ,
माय झाली भारताची
नवा इतिहास घडला
तुझ्या राहिल्या स्वप्नांना
रत्न लावतील ग जीव ,
जड अंःकरणाने माई
श्रद्धांजली चा हा भाव
—————————————-
आपल्या ❝ *दैनिक चालू वार्ता* ❞ वृत्तपञाचे *( औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी )* *अनिकेत संजय पुंङ* यांनी *अनाथांचा आधारवाङ पद्मश्री सिंधूताई सपकाळ ( माई )* यांच्या आयुष्यभर केलेल्या कार्यांची कवितेतून सांगङ घालून त्यांना कवितेतून श्रद्धांजली अर्पण केली .