दैनिक चालु वार्ता
प्रदिप मडावी
नकोडा :- आज दिनांक 3 जानेवारी 2022 क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती परिवर्तन बौद्ध महिला मंडळ नकोडा यांच्या वतीने नकोडा गावात साजरी करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या यंग चांदा ब्रिगेड चंद्रपूर शहर महिला आघाडी संघटीका आदरणीय वंदनाताई हातगावकर, भाग्यश्री हांडे (शहर युती प्रमुख), कल्पना ताई शिंदे,(दिव्यांग बांधव शहर संघटिका), सविता ताई दंडारे (बंगाली समाज शहर संघटिका) आशा ताई देशमुख (वार्ड शहर प्रमुख) आणि वैशाली ताई मेश्राम (आदिवासी संघटिका) कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या आदरणीय वंदनाताई हातगावकर यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर खूप मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या हस्ते परिवर्तन बौद्ध महिला मंडळ नकोडा यांनी विधवा महिलांना साडी चोळी देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित परिवर्तन बौद्ध महिला मंडळाच्याअध्यक्षा व माजी ग्रामपंचायत सदस्या सौ रंजना ताई झाडे
तसेच मंडळाच्या सचिव सौ.पुष्पांजली काटकर मंडळाच्या उपाध्यक्ष सौ शोभा रंगारी कोषाध्यक्ष सौ माधवी भगत सदस्य सौ.भारती ठमके सौ उज्वला ठमके सौ.किरण कांबळे सौ संघरत्ना ठमके सौ.उज्वला पाटील आणि सौ.वंदना लोहकरे आणि ज्येष्ठ महिला नागरिक श्रीमती माला ताई पेंदोर मिराबाई कुळे तसेच ग्रामपंचायत सदस्या सौ.ममता ताई मोरे तसेच गावातील सर्व महिला उपस्थित होत्या परिवर्तन बौध्द महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रंजना ताई झाडे यांनी भविष्यात विधवा वृद्ध महिलांसाठी वृद्धाश्रमाची संकल्पना जाहीर केली.
तसेच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संकल्पना जाहीर केली अशाप्रकारे कार्यक्रमाचे अध्यक्षा आदरणीय वंदनाताई हातगावकर यांच्या अध्यक्षिय भाषणानंतर परिवर्तन बौध्द महिला मंडळाच्या कोषाध्यक्ष सौ. माधवी भगत यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले आणि अध्यक्षांच्या परवानगीने या कार्यक्रमाची सांगता आली.