दैनिक चालू वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
खामगाव :- दि.5 बुलढाणा जिल्यातील खामगाव शहरात 29 जून 1961 साली जन्मलेले अशोक सोनोने, आज त्यांची ओळख प्रत्येकाचे अंतरंगात अशोकभाऊ म्हणून आहे. आपल्या परिवारातील घटक म्हणून अशोकभाऊंना लोक समजतात आणी हे निर्विवाद सत्य आहे. आपल्या आज पर्यंतच्या आयुष्यात कुणालाही न दुखवणारा,अहोरात्र लोकांचे सुखदुःखात धाऊन जाणारा असे व्यक्ती आहे. अशोकभाऊ याच कर्तृत्वामुळे भारिप बहुजन महासंघाचे खामगाव शहर सचिव पदापासून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्षपदा पर्यन्त पोहचले.
आज ते राजकारणातील प्रमुख घटक असलेल्या वंचित आघाडीचे पार्लमेंट्री बोर्ड सदस्य आहेत. लहानपणापासून आंबेडकरी चळवळीशी जोडल्या गेलेल्या अशोकभाऊंची आंबेडकर घराण्याशी निष्ठेेचे व कौटूंबिक संबध आहेत. फुले, शाहु, आबेडकर यांचे विचाराचा वारसा चालवून, सर्वधर्मसमभाव जोपासून गोरगरिबांच्या कल्याणासाठी अशोकभाऊ यांचे कार्य आजही अविरत पणे सुरू आहे
मै तो अकेलाही था मगर, लोग आते गये…कारवा बनता गया असेच काही या व्यतिमत्वाचे जीवनाचे गमक आहे.
आज प्रचंड मोठा चाहत्यांच्या संग्रह, सर्व घटकातील जिवाभावाचे मित्र, आदर्श माता, आदर्श पत्नी ज्यांनी भाऊंना त्यांचे सामाजिक व राजकीय जीवनात समर्थ साथ दिली. दोन मुली मोठी डॉ. मोनाली (एम. एस.गायनिक आणी दुसरी डॉ. श्वेता (मास्टर इन फिजीओथेरपी) तर मुलगा भूषण हा वकीलीचे शिक्षण घेत आहे. अश्या रितीने मुलांना उच्चशिक्षित करून त्यांना भाऊंनी संस्कार दिले.
प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर खामगाव नागरिकांनी नागरिक सत्कार समिती करून त्यांचा सत्कार करताना 300 संघटना सहभागी होऊन या लोकांनी संस्थानी त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे हा अशोकभाऊ च्या लोकप्रियतेचा पुरावा आहे. समाज भूषण पुरस्कार, रुग्ण मित्र पुरस्कार, शांतिदूत पुरस्कार असे सन्मानाचे पारतोषिक पुरस्काराचे रुपाने या व्यक्तीस आपल्या कार्या मुळे प्राप्त झाले आहेत. सर्वात जास्त रक्तदान शिबीर आयोजीत केल्याची अशोकभाऊंची खामगाव रुग्णालय मध्ये नोंद आहे.
बुलढाणा पोलिस दलातर्फे जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यास केलेल्या मदतीबाबत अमरावती पोलीस आयुक्त यांनी पत्र देऊन त्यांना सन्मानित केले आहे. सन 2000 पासून 2009 पर्यंत सामूहिक सोहळ्याचे आयोजन करून शेकडो जोडप्यांचे लग्न लावून देण्याचे समाजकार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम त्यांचे हातून घडले आहे व घडत आहे. कोरोना चे संकटात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हेल्पलाईन सुरू करून अनेक रुग्णांना त्यांनी मदत केली आहे. यात त्यांनी कोरोना रुग्णांची सेवा करण्या करता स्वतः रुग्णालयाला पत्र देऊन परवानगी मागितली होती मात्र वया चे कारणाने त्यांना ही सेवा करण्यास परवानगी मिळाली नाही.
मात्र यात त्यांचा सेवा भावलक्ष्यात येतो ही बाब महत्वाची अशोकभाऊ 24 तास 365 दिवस रुग्णांना मदत करतात त्यांचा मोबाईल 24 तास सुरू असतो. कोविड काळात या सोनोने परिवाराने रुग्ण व गोरगरिबांची सेवा केली. राजकिय जीवनात श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना समर्पित होऊन हे त्यांचे कार्य पुढे अविरतपणे सुरू राहणार आहे हा त्यांचे जीवनातला संकल्प आहे. त्यांचे कार्याची पावती म्हणून लॉयन्स क्लब ऑफ सिल्व्हरसिटीचे आजीवन मानद सदस्य, गो.से.महाविद्यालयाचे संचालक, राजीव गांधी पतसंस्थेचे संचालक, लॉयन्स क्लब चे सदस्य अशा अनेक पदावर त्यांची निवड झाली आहे.
या पूर्वी त्यांना मिळालेला समाज भूषण पुरस्कार या नंतर झालेला नागरी सत्कार ,आणि आता प्रेस क्लब च्या वतीने अशोक भाऊंना दिल्या जाणारा मानाचा खामगाव रत्न पुरस्कार ही बाब अशोकभाऊ साठी अभिनंदनीय असून जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपले देव तेथेचि जाणावा, तोचि साधू ओळखावा.
या म्हणी प्रमाणे सर्व धर्म समभाव जोपासून कार्यरत अशोकभाऊ यांना दिलेला खामगाव रत्न पुरस्कार हा खर्या अर्थाने योग्य व्यक्तीमतावला प्रदान होत आहे. याचा भाऊच्या मित्र परिवार चाहते स्नेही कार्यकर्ते व आम्हाला सार्थ अभिमान आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे श्री.अशोकभाऊ सोनोने यांना खामगाव रत्न पुरस्कार मिळाला त्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.