
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
लोहा :- येथील अभिवक्ता संघाची निवडणूक आज रोजी पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी बिनविरोध अॅडवोकेट मोटरवार यांची निवड झाली. अध्यक्ष पदासाठी आलेला अॅड. एन. के.वरपडे यांच्याकडे बार कौन्सिल ची पात्रता धारण केली नसल्याने बाद झाला.उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत अॅड.व्ही.टी. मच्छेवार यांनी एकूण झालेल्या 33 मतांपैकी 33 मते मिळवीत प्रतिस्पर्धी उमेदवार अॅड. व्ही.एन. घोडके यांचा पराभव केला. सचिव पदासाठी अॅड. व्ही.बी.पवार यांनी 31 मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवार अॅड. डी.व्ही.केंद्रे यांचा 29 मतांनी पराभव केला. तसेच कोषाध्यक्ष पदासाठी अॅड.पि. एम.शेटे यांनी एकूण झालेल्या 33 मतांपैकी 33 मते मिळवीत अॅड. एस. डी. पोतदार यांचा पराभव केला.
अभिवक्ता संघाची निवडणूकिसाठी सर्वानुमते मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. जी. एस. डांगे यांची निवड करून त्यांनी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पूर्वनियोजित जाहीर केलेल्या निवडणुकीच्या वेळापत्रकाप्रमाणे निवडणूक पार पडली. सदरील निवडणुकीत अॅड.जी.एस.डांगे यांनी बार कौन्सिलच्या नियमांवर आधारित निवडणूक घेतली. पॅनलचे निवडणुकीची प्रचार यंत्रणा अॅड. विलास चव्हाण, अॅड. एस. जी. जाधव यांनी अॅड.सतीश ताटे, अॅड. नरेंद्र बोनागिरे, अॅड. एच. एम. पाटील,अॅड. भागवत केंद्रे, अॅड.बडवणे यांच्या सहकार्याने राबविली. तर अॅड.पि.यू. कुलकर्णी,अॅड. एस. बी. कांबळे, अॅड. गरुडकर, अॅड. लुंगारे, अॅड.टेळकीकर, अॅड. देवीदासराव मोरे, अॅड. बारबिन्ड,अॅड. फुके यांनी विशेष परिश्रम घेतले.
विजयी उमेदवारांचे नांदेड चे खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर, लोहाचे नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पा. पवार,माणिकराव चव्हाण (मुकदम), किरण सावकार वट्टमवार,केशवराव मुकदम,छत्रपती धुतमल, नागेश सावकार दमकोंडवार,सुधन वट्टमवार आदी नि शुभेच्छा दिल्या.