
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
सध्या जिल्ह्यात कोवीडचे रुग्ण वाढत आहेत . संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात ( जिल्हा टास्क फोर्स ) आणि शहरातील ( खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर ) यांची एक बैठक पार पडली . यात काही महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले .
*जिल्हाधिकारी यांचे निर्णय खालीलप्रमाणे -*
१) कोविड टेस्ट positive आल्यावर रुग्णाला गृह विलगीकरणात ( Home Isolation ) राहायचे असेल तर घरातील सर्व सदस्यांचे लसीकरण ( दोन्ही डोस ) पूर्ण असणे बंधनकारक .
२ ) घरातील इतर सदस्यांनी Home Quartine राहणे बंधनकारक ( इतर सदस्यांनी बाहेर फिरू नये )
३) गर्दीवर नियंत्रण ठेवा . हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्या .
४) सभा / कार्यक्रम / हॉटेल / रिसॉर्ट मधील गर्दीचे चित्रीकरण करा .
५) हुरडा पार्टीवर पूर्णपणे निर्बंध / हुरडापार्टी सुरू असल्यास पोलीस कार्यवाही करणार .
६) शहराबाहेरील फार्म हाऊस / रिसॉर्टवर बंदी . सुरू दिसल्यास पोलीस कार्यवाही होणार .
७) मंगल कार्यालयाने आगामी लग्नाच्या booking ची माहिती प्रशासनाला कळवावी . 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याचे मंगल कार्यालयाने Under taking द्यावे लागणार . नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस कार्यवाही होणार .
८) आजपर्यंत १८७५ वाहन चालकांचे license रद्द केले यापुढे ही कार्यवाही सुरू राहणार . कार्यवाही झाल्यास वाहन विक्री करता येणार नाही ( संजय मैत्रेवार , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी )
९) लसीकरण आणि मास्क शिवाय पेट्रोल नाही .
१०) सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द .
११) शहर आणि ग्रामीण भागातील लग्नामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भेटी द्या .
यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या सह म.न.पा. प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे , पोलिस अधिक्षक निमितकुमार गोयल , उपायुक्त डॉ. उज्जवला बनकर , वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा , जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी तसेच विविध खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर्स उपस्थित होते .