
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे.
देगलूर :- शिवा संघटनेच्या मागणी पाठपुराव्यानुसार श्रीक्षेत्र कपिलधार विकासासाठी 100 कोटीच्या प्रस्ताव सादर करण्याचे शासनाचे आदेश व आज प्रत्यक्ष पाहणी मागील काही दिवसांपूर्वी श्री क्षेत्र कपिलधारच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी पालकमंत्री मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा. ना. हसनजी मुश्रीफ साहेबांकडे शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.मनोहरजी धोंडे सर यांनी केली होती.या मागणीला प्रतिसाद देऊन मुश्रीफ साहेबांनी तातडीने प्रशासनास सकारात्मक निर्देश दिले होते.
आज या बाबत मा.प्रा.मनोहरजी धोंडे सर, आमदार संदीपभैय्या क्षीरसागर तसेच मा.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अजित जी पवार व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन श्री क्षेत्र कपिलधार येथे जाऊन मा.प्रा.मनोहरजी धोंडे सरांनी प्रत्यक्ष पाहणी केली. याबाबत लवकर विकास आराखडा सादर करण्याबाबत प्रशासनास सूचना केल्या आहेत.