
दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
शिरपूर :- या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावित्रीची लेक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मीना पटेल मॅडम हे होते. प्रमुख पाहुणे माता-पालक श्रीमती हेमलता चौधरी,श्रीमती दिपाली चौधरी, श्रीमती ज्योती शिरसाठ,श्रीमती ललिता राजपूत, श्रीमती कविता गुजर,श्रीमती सुरेखा राजपूत, श्रीमती जयश्री राजपूत,श्रीमती लता मराठे, श्रीमती प्रतिभा धनगर, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. एफ.शिरसाठ सर यांनी सर्व मान्यवर माता-पालक यांचे
स्वागत केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या उत्तम शिक्षिका, समाजसुधारक,कवयित्री म्हणून ओळखल्या जातात.
त्यांनी महिलांचे हक्क आणि शिक्षण या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्याच्या परिणाम आज स्त्री शक्ती सर्व क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहे. स्त्री शिकली तर कुटुंब शिकते हा अनुभव विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती दिपाली निकम मॅडम यांनी व्यक्त केला व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची कविता सुंदर शब्दात व्यक्त केली. श्री. एस.आर. देसले सर यांनी आपल्या प्रस्ताविकेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचे महत्व आजच्या काळातील स्त्रीशक्षणाचे सर्व दूर प्राप्त होणार फलित होय.
तसेच कुमारी शिरसाठ दिपाली कैलास या विद्यार्थिनीने मी सावित्रीबाई फुले बोलते या विषयावर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार व्यक्त केले यावेळी पर्यवेक्षक श्री पी व्ही पाटील सर यांनी जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान अंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी श्री. एन. वाय. बोरसे यांनी केले यानिमित्ताने सावित्रीची लेक या विषयावर वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला त्याचे परीक्षण श्रीमती दिपाली निकम मॅडम यांनी केले या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.