
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
दि.6 वृत्तपत्र किंवा दूरचित्रवाणी यासारख्या जनसंज्ञापनाच्या माध्यमातून वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या वृत्त विषयक गरजा भागविण्याचे कार्य म्हणजे वृत्तपत्रकारिता असे म्हणता येईल. लोकशाही राज्यव्यवस्थेची इमारत कायदेमंडळ, राज्यशासन, न्यायसंस्था व पत्रकारिता या चार आधारस्तंभावर उभी असते. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांचे (दर्पण) ,गोपाळ गणेश आगरकर यां चे (केसरी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे (बहिष्कृत भारत),गजानन त्र्यंबक मडखोलकर यांचे (दैनिक तरुण भारत), अशा अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे करण्यात आले आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन म्हणून घोषित केलेला आहे. त्यानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय शेंबा बु. नांदुरा (जिल्हा बुलढाणा) येथे पत्रकार दिन विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी यांचा सत्कार करून साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी दैनिक सकाळ नांदुरा तालुका प्रतिनिधी वीरसिंग राजपूत, नांदुरा( ग्रामीण) दैनिक सकाळ प्रशांत पाटील, सुरेन्द्र चौधरी (माजी पत्रकार) दैनिक मराठा दर्पण (ग्रामीण)राहुल सुरडकर, दैनिक चालू वार्ता,नांदुरा. (बुलढाणा जिल्हा) प्रतिनिधी. किशोर वाकोडे यांचा सत्कार शेंबा ग्रामपंचायत सरपंच ॲड.नंदकिशोर खोंदले यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भिडे, सुधाकर बोरकर, सुरेंद्र चौधरी, कैलास सुशीर, ज्ञानेश्वर घोंगे,सुभाष कवळे तथा गावकरी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत कर्मचारी निलेश दाभाडे यांनी केले.