
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :- नांदेड जिल्ह्यातील सर्व इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शाळा व वर्ग बंद राहतील.ऑनलाईन शिकवणी वर्ग चालू राहतील.इयत्ता नववी ते बारावी वर्ग कोरोना विषयक नियमाचे पालन करून प्रत्यक्ष चालू राहतील.कोविड 19 विषयक सर्व आदेशाचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन शाळा व्यवस्थापनाने करावे.तसेच रुग्ण आढळून आल्यास तात्काळ शाळा बंद करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
शिक्षकांनी कोविड काळात शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन शिक्षण विषयक कामकाज व कोविड प्रतिबंध विषयक जिल्हा प्रशासनाने दिलेली सर्व जबाबदारी पार पाडावी. सदर आदेश दिनांक-10-01-2022 पासून 30-01-2022 पर्यंत नांदेड जिल्हा क्षेत्रात लागू राहील.असे मा.जिल्हाधिकारी श्री डॉ.विपीन इटनकर साहेब यांनी पत्राद्वारे कळविले आहे.