
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- जव्हार सारख्या आदिवासी ग्रामीण भागात काम करणाऱ्या युवा सामर्थ्य प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मुकेश वातास यांच्या ३२ व्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्यातील जि.प.शाळा खडखड येथे ४ जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या व धरती आबा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप करण्यात आले.ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत हातभार लागावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सदर कार्यक्रमात चे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक साहित्याच्या किटमध्ये वही,चित्रकला वही,पेन्सिल, खोडरबर, शॉपनर अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करून युवा सामर्थ्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षांच्या वाढदिवस चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना अध्यक्षांनी ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील समस्या सोडवण्यासाठी युवा सामर्थ्य प्रतिष्ठान ही संस्था नेहमीच कटिबद्ध असेल अशी ग्वाही दिली तर संस्थेच्या उपाध्यक्षांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर करताना संस्थेचे मागील काळात केलेल्या समाजपयोगी कामे आणि संस्था करीत असलेल्या कामाच्या स्वरूपाची माहिती देऊन संस्थेच्या कामाची पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती दिली. त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेत अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याने समाधान व्यक्त करुन विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्य मिळाले आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊन व भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होईल असे आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमा प्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्या सविता घाटाळ अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशाताई तसेच युवा समर्थ प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कवडे मॅडम तर आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य प्रशांत वाघमारे यांनी केले.