
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी :- लोहारा तालुक्यातील माकणी येथे दिनांक 04/01/2022 रोजी भारत शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, माकणी सामाजिकशास्त्र मंडळाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.एच.एन.रेडे यांनी भूषविले. समाजामध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या सामाजिक समस्याची जाणीव, त्याचे दुष्परिणाम व त्यावरील उपाय कशाप्रकारे करता येईल त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी सामाजिक शास्त्र मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणे अपेक्षित आहे.
अशा प्रकारचे विचार उद्घाटनपर भाषणात डॉ. प्रभाकर गायकवाड यांनी व्यक्त केले. सामाजिकशास्त्र मंडळाचे चेअरमन डॉ. अनिल गाडेकर यांनी या सामाजिकशास्त्र मंडळाचा उद्देश व वर्षभरातील कार्यक्रम विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे घेतले जावेत याची रूपरेषा आपल्या प्रास्ताविकात मांडली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्रीकृष्ण मुंडे यांनी मानव्यविद्याशाखा अंतर्गत येणारे सर्व सामाजिक शास्त्राची आवश्यकता दोन महायुद्धानंतर आवश्यक वाटू लागली. त्यामुळे समाजाच्या प्रगती व विकासाच्या अनुषंगाने सामाजिक शास्त्रात संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सामाजिकशास्त्र मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे यांनी भारतीय समाज हा पुरुषसप्रधान समाज असून येथील कुटुंब संस्था, विवाह संस्था सामाजिक मूल्याचे, रीतिरिवाज व परंपरेचे जपणूक व संवर्धन करत असून भारतीय समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात म्हणूनच पश्चिमात्य समाजापेक्षा भारतीय समाजातील कुटुंब व्यवस्था प्रभावी असल्याचे मत अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभागाचे विभाग प्रमुख व सामाजिकशास्त्र मंडळाचे सचिव प्रा. सतीश गावित यांनी केले तर सामाजिक शास्त्र मंडळाचे सदस्य तथा इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दिलीप बिराजदार यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले. महाविद्यालयातील प्रा.डॉ.एस.आर.बिरादार, डॉ.डी.एस.कांबळे, प्रा.किरण लोमटे, डॉ.आर. एम.खराडे डॉ. वैभव पतंगे, डॉ.ए.सी.पाटील, डॉ. येल्लुरे सर, OS.जगताप किशोर, डॉ.बालाजी जावळे, प्राध्यापिका डॉ. निर्मळे एम.एस.व डॉ चोचंडे आर. यू.प्राध्यापिका अंजली मुसांडे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपस्थित राहून अनमोल असे सहकार्य केले.