
दैनिक चालु वार्ता
संघरक्षित गायकवाड
सातारा :- येथील राष्ट्रोत्सव संयोजन समितीतर्फे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून अनिल वीर यांचा सत्कार बी.एल.माने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णा वायदंडे होते.
यावेळी मान्यवरांनी गौरवशाली मनोगत व्यक्त केली.सदरच्या कार्यक्रमास रिजवान सय्यद, जावेद खान, अजित सोनवणे,राम पवार आदी सर्व मीडियाचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर – कार्यकर्ते उपस्थित होते.बळीराजा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गौतम भोसले यांनी स्वागत केले.ऍड. विलास वहागावकर यांनी आभारप्रदर्शन केले.