
दैनिक चालु वार्ता
मुंबई: उदगीर शहरातून जाणारे व शहरालगत असलेल्या व राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणा संदर्भात व शहराला जोडणार्या नवीन उड्डाणपूल बाबत आज मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली या वेळी शहरातील अनेक रस्ताच्या चौपदरीकरणला मान्यता देण्यात आली आहे यात मौजे तिवटग्ळ ते बोरताळा ताडां उदगीर रिंग रोड चौपदरीकरण करणे डॉ जाकिर हुसेन चौक ते तिवटग्ळ चौपदरीकरणे ,अष्टागाव ते अष्टामोड चौपदरीकरणे शिरूर ते उदगीर चौपदरीकरणे याचा समावेश आहे यामुळे शहराच्या दळणवळण व वाहतूकीस मोठा फायदा होणार आहे यामुळे शहर अनेक मोठ्या बाजारपेठास जोडले जाणार असून यामुळे व्यापार वंद्धिगत होण्यास मदत होणार आहे.
आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला असून याला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.या बैठकीला राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता श्री संतोष शेलार,सहाय्यक मुख्य अभियंता श्री पुरी साहेब, कार्यकारी अभियंता(रा.प)नांदेड एस एस सावत्रे ,कार्यकारी अधिकारी जी.बी स्वामी व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बैठकीत उदगीर शहरालगतच्या महत्त्वाच्या बाबी वार्षिक आराखडा मध्ये समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने नमूद केले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तीवड्ग्याळ ते बोरताळा तांडा हा प्रस्तावित रिंग रोड ,या सोबतच तिवाटग्याळ ते उमा चौक हा रस्ता चौपदरीकरण करणे ,एसटी कॉलनी येथील उड्डाणपुलावरून अहमदपूर रोडला जोड रस्ता काढणे ,उदगीर ते शिरूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करणे, मुख्य रस्ता लातूर उदगीर रस्त्यावरील आस्टा मोड ते अस्टा गाव हा राहिलेला भाग चौपदरीकरणासह मंजूर करणे बाबत येणाऱ्या ऍनिवल प्लॅन मध्ये वरील नमूद कामे समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या आहेत.
आज या कामाला बैठकीत तत्वता मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याची ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे ,जांब ते मोघा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील शिल्लक राहिलेला शिवाजी चौक ते उड्डाणपूल व काही भाग शाहू चौकापर्यंत सर्विस रोड करणे, नाल्या करणे ,दुभाजक करणे या बाबी समाविष्ट करून तात्काळ काम करण्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर जाब ते मोगा या राष्ट्रीय महामार्गावरील शिल्लक राहिलेली कामे यामध्ये प्रामुख्याने पाटोदा( बु) येथील दोन्ही बाजूच्या नाल्या तिरुका येथील ब्रिज , नळगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ते गावापर्यंत नाल्या, नळगीर ,घोनसी ,पिंपरी ,येथील सर्विस रोड त्यामध्ये असलेले डिव्हायडर बरेकटिंग करणे, उदगीर येथील मुख्य मज्जिद ते म्हाडा पर्यंत नाल्या करणे प्रत्येक गावातील बस स्थानकावर बस थांबा बनवणे, प्रत्येक गावात हायमॅक्स लाईट लावणे ,प्रत्येक गावातील नाल्यांच्या बाजूने मुरुंम भरणा करून सर्विस रोड व अप्रोच रोड तात्काळ बनवणे याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून कोणत्याही परिस्थितीत ही कामे दोन महिन्यांमध्ये वरील कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत