
दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
शिरपूर :- दिनांक 6/01/2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खर्दे अंतर्गत वयोगट 15 ते 18 चे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.प्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.एफ. शिरसाठ व पर्यवेक्षक श्री.पी.व्ही.पाटील यांनी लसीकरणाविषयी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून लसीकरणाचे आरोग्यासाठी किती महत्त्व आहे या विषयी मार्गदर्शन केले. यासाठी उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्र खर्दे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज पाटील, डॉ मेघराज राठोड व त्यांच्या टीमचे गुलाबपुष्प देऊन प्राचार्य आर. एफ.शिरसाठ सर यांनी स्वागत केले, तसेच ग्रामपंचायत भोरखेडा चे सरपंच श्री.दिपक गुलचंद भिल,तसेच श्री.भुपेंद्र राजपूत यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबिराचे उदघाटन करण्यात आले त्यांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने करण्यात आले,यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज पाटील यांनी लसीकरण संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यासाठी डॉ मेघराज राठोड, आरोग्य सेविका श्रीमती आर.एच.ठाकरे,श्रीमती ए. व्ही. वळवी ,आरोग्य सेवक श्री.पी.एस.साळुंखे, आशासेविका श्रीमती वंदना राजपूत,श्रीमती सरला जमादार यांनी लसीकरण कार्यक्रम पूर्ण केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री एन. वाय.बोरसे यांनी केले शिबीर यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी श्री.सुनिल पाटील, श्री एस आर देसले,श्री एस एम पाटील, श्री पी टी चौधरी, श्री व्ही एस ईशी, श्री व्ही डी पाटील , श्री एन डी चव्हाण, श्री व्ही बी शर्मा ,श्री आर जी पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले