
दैनिक चालू वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
बुलडाणा :- दि.6 बुलडाणा जिल्हा जात पडताळणी समितीने जात वैधता प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अॅड अनिल इखारे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव एम.एम मेरत यांना केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदुरा तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२१ मध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र दि.१८ जानेवारी पर्यंत सादर न केल्यास तसा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार असल्याचे कळविले आहे.
एकट्या नांदुरा तालुक्यातील नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती चे १५४ सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र येणे बाकी आहे. त्या सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.ह्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ता अॅड. रविंद्र भोजने व जिल्हा उपाध्यक्ष अरविंद खंडारे उपस्थितीत होते.