
दैनिक चालु वार्ता
लोहारा प्रतिनिधी
महेश गोरे
लोहारा :- प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालय मुळज व ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशन, उमरगा यांच्या वतीने आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून उमरगा-लोहारा तालुक्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या जवळपास ५० मान्यवरांचा सन्मानपत्र, पुस्तक, नोटपॅड व लेखनी देवून यथोचित गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम वाचनालयाच्या उमरगा शाखेत पार पडला.
कार्यक्रमास सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, करीम शेख, राजू बटगिरे, प्रदिप मोरे, ॲड.ख्वाजा शेख, प्रदिप चौधरी, बबिता मदने आदी फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य होते. प्रास्ताविक ॲड.शेख यांनी केले. मनोगत ज्येष्ठ पत्रकार मा.मारुती कदम, मा.युसुफ मुल्ला, मा.महेश निंबर्गे व मा.अमोल पाटील यांनी मांडले. आभार सत्यनारायण जाधव यांनी व्यक्त केले.
या वेळी लोहारा तालुक्यातील सन्मानित करण्यात आलेले पत्रकार नीळकंठ कांबळे, अब्बास शेख, कालिदास गोरे, बालाजी बिराजदार ,गणेश खबोले, यशवंत भुसारे, गिरीश भगत, सुमित झिंगडे, महेश गोरे, सुधीर कोरे आदी पत्रकार यांना सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.